अमेरिका ते भारत एकेरी इंजिनच्या विमानाचा एकटा प्रवास

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सतीशचंद्र सोमण ह्यांनी अमेरिकेहून भारत पर्यंत एकेरी इंजिनच्या विमानाने एकट्याने असा आधी कधीही न झालेला प्रवास केला. केवळ ७४ तासांचा अनुभव आणि त्यातही सर्वात लांब सलग उड्डाण फक्त २ तासांचे ह्या पार्श्वभूमीवर अनेकजण ह्या निर्णयावर आश्चर्यचकित झाले. पण काही लोकांनी मदत केल्याने हा प्रवास जमू शकला. हा प्रवास त्यांनी सेसना १७२ प्रकारच्या विमानातून केला.

सोमण ह्यांनी ह्या प्रवासावर एक इ-पुस्तक प्रकाशित केले आहे. ह्या पुस्तकात त्यांनी तयारी, विमान खरेदी, प्रवास ह्या बद्दल लिहिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →