२९ ऑक्टोबर १९७२ला लुफ्तान्सा ६१५ चे अपहरण झाले. हे अपहरण पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या दहशतवादी गट ब्लॅक सप्टेंबरशी सहानुभूती ठेवण्याऱ्या दहशतवादी गटाने घडवून आणले होते. म्युनिच हत्याकांडात पकडले गेलेले तीन ब्लॅक सप्टेंबरचे आतंकवादी सोडविण्यास ह्या विमानाचे अपहरण करण्यात आले होते. हे गुन्हेगार पश्चिम जर्मनीच्या म्युनिच मध्ये बंदीवान होते. हे विमान दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळ, सीरिया वरून आपले गंतव्य फ्रांकफुर्ट विमानतळ, जर्मनी गाठण्यासाठी निघाले होते जेन्हा ही घटना घडली. ओलीस पकडलेल्या विमानातील प्रवासी व विमानावरील खलाश्यांच्या बदल्यात जर्मन सरकारने म्युनिच हत्याकांडातील गुन्हेगारांना सोडुन दिले ज्यांना पुढे लीबियाच्या हुकुमशहा व सर्वोच्च नेता मुअम्मर अल-गद्दाफीने शरण दिले.
इस्रायल आणि इतर पक्षांनी पश्चिम जर्मन सरकारावर टीका केली. पश्चिम जर्मन सरकारावर असा पण आरोप झाला होता की ब्लॅक सप्टेंबर संघटनेशी त्यांनी एक गुप्त करार केला होता की दहशतवाद्यांना सोडवील्यास ब्लॅक सप्टेंबर आश्वासन देइल की ते पश्चिम जर्मनीवर आणखी हल्ले करणार नाहीत.
लुफ्तान्सा ६१५चे अपहरण
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?