आयसी ८१४चे अपहरण

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

आयसी ८१४चे अपहरण

इंडियन एरलाइन्स IC ८१४ विमानाचे अपहरण : इंडियन एरलाइन्सच्या आयसी ८१४ विमानाचे, काठमांडू (नेपाळ) ते दिल्ली (भारत) या प्रवासादरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून २४ डिसेंबर १९९९ रोजी १७८ प्रवाशांसोबत अपहरण करण्यात आले.

आयसी ८१४ हे एरबस ए-३०० जातीचे विमान होते. २४ डिसेंबर १९९९ रोजी ते नेपाळची राजधानी काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाहून, दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाले. भारतीय प्रमाणवेळ १७:३० च्या सुमारास सशस्त्र दहशतवाद्यांनी विमानाचा ताबा घेतला. दिल्ली या नियोजित गंतव्याऐवजी विमानाला अमृतसर, लाहोर, दुबई मार्गे अफगाणिस्तानात कंदहार येथे उतरवले. दरम्यान दहशतवाद्यांनी एका प्रवाशाची हत्या केली तर काही जणांना जखमी केले. अफगाणिस्तानात त्यावेळी तालिबानची सत्ता होती. यामुळे भारताला अपहरणकर्त्यांसोबत वाटाघाटींदरम्यान अडचणींचा सामना करावा लागला. भारतीय सशस्त्र दलांनी काही कारवाई करू नये यासाठी तालिबानी दहशतवाद्यांनी विमानाला घेराव घातला. अखेर ७ दिवसांनी भारतातर्फे ३ दहशतवाद्यांना सोडून दिल्यावर हे अपहरण नाट्य संपले. भारताने सोडून दिलेले ३ दहशतवादी पुढील प्रमाणे - मुश्ताक अहमद झरग‍र, अहमद ओमार शेख, आणि मौलाना मसूद अझहर.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →