मसूद अझहर

या विषयावर तज्ञ बना.

मौलाना मसूद अझहर (१० जुलै किंवा ७ ऑगस्ट, इ.स. १९६८; बहावलपूर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी मुजाहिदीन संघटक असून काश्मिराच्या पाकिस्तान-प्रशासित भागात सक्रिय असलेल्या जैश-ए-मोहम्मद संघटनेचा संस्थापक व नेता आहे.

मसूद अझरचे वडील, अल्ला बख्श शब्बीर सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते. त्याशिवाय ते एक पोल्ट्री आणि डेरी फार्म चालवीत. मसूद अझरचे जिहादी शिक्षण कराचीतल्या बिनोरी मदरशात झालं. हा मदरसा देवबंदी गटाचा आहे. बिनोरी मदरशाचे मुख्य कामच जिहादी तयार करणे हे होते. येथे शिकलेला अझर अफगाणिस्तानात सोवियेत संघाविरोधात लढायला गेला. अफगाणिस्तानातली जिहादींची लढाई आयएसआयने उभारली होती. जिहादींचे खाजगी सैन्य उभारून. त्यासाठी आयेसआयने हरकत-उल-मुजाहिद्दीन नावाची संघटना उभारली होती. अफगाणिस्तानच्या लढाईत जखमी होऊन आलेला अझर त्या संघटनेत १९८५ साली सामील झाला. संघटनेचा प्रमुख म्हणून निवडला गेलेला अझर साद-ए-मुजाहिदीन या उर्दू नियतकालिकाचा आणि सवते कश्मिर या अरबी वृत्तपत्राचा संपादक झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →