अमन सेहरावत

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अमन सेहरावत

अमन सेहरावत (१६ जुलै, २००३:बिरोहर, हरयाणा, भारत - ) हा एक भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीगीर आहे. हा सहसा ५७ किलो वजनी गटात भाग घेतो. याने २०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक मिळवले. वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकणारा तो सर्वात तरुण भारतीय आहे. हा २०२२ २३ वर्षांखालील जागतिक विजेता आहे

सेहरावतचा जन्म हरियाणातील बिरोहर गावात हिंदू जाट कुटुंबात झाला. हा तेथे मातीच्या अखाड्यात कुस्ती खेळत असे. २०१२ उन्हाळी ऑलिंपिकमधील सुशील कुमारच्या रौप्यपदकाने प्रेरित होऊन, त्याने वयाच्या १०व्या वर्षी उत्तर दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये प्रवेश घेतला. तो ११ वर्षांचा असताना त्याचे दोन्ही पालक वेगवेगळ्या आजाराने मरण पावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →