अबखाझिया हा काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील व कॉकेशस भौगोलिक प्रदेशामधील एक वादग्रस्त भूभाग आहे. १९९९ साली जॉर्जिया देशापासून फुटून स्वातंत्र्याची घोषणा करणाऱ्या अबखाझियाला एक स्वतंत्र देश म्हणून सध्या केवळ रशिया, निकाराग्वा, व्हेनेझुएला, नौरू, तुवालू ह्या देशांनी तसेच दक्षिण ओसेशिया ह्या अंशतः मान्य देशाने मान्यता दिली आहे. जॉर्जियाचा ह्या स्वातंत्र्याला पूर्ण विरोध असून अबखाझिया आपल्याच देशाचा एक स्वायत्त भाग आहे अशी भूमिका त्याने घेतली आहे. युरोपियन संघ, नाटो व इतर बरेच देश मात्र स्वतंत्र अबखाझिया देशाला मान्यता देण्याच्या विरोधात आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अबखाझिया
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!