दक्षिण ओसेशिया

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

दक्षिण ओसेशिया

दक्षिण ओसेशिया हा जॉर्जिया देशातील रशियाच्या सीमेजवळील एक वादग्रस्त भाग आहे. १९९१ साली दक्षिण ओसेशियाने स्वातंत्र्याची घोषणा केली. जॉर्जियाने ह्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व दक्षिण ओसेशिया स्वतंत्र देश नसुन आपल्याच देशाचा एक भाग आहे अशी भूमिका घेतली आहे. २००८ सालच्या रशिया-जॉर्जिया युद्धानंतर रशिया व निकाराग्वा ह्या देशांनी दक्षिण ओसेशिया देशाला मान्यता दिली आहे, तसेच इतर काही देश भविष्यात हे धोरण स्वीकारण्यास तयार आहेत. युरोपियन संघ, नाटो व इतर बरेच देश मात्र स्वतंत्र दक्षिण ओसेशिया देशाला मान्यता देण्याच्या विरोधात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →