अन्वर हुसेन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अन्वर हुसेन

अन्वर हुसेन (जन्म:मे २०, १९७५, बुधगाव - ) हे महाराष्ट्रातील चित्रकार आहेत. त्यांनी विशेषतः ॲक्रिलिक माध्यमात चित्रे काढलेली आहेत. तसेच तैलरंग, जलरंग या माध्यमातसुद्धा ते काम करतात. त्यांच्या चित्रात रचनेतील साधेपणा, पर्स्पेक्टिव्हवरची पकड, रेखाटनाची अचूकता, तंत्रशुद्धता आणि भावपूर्णता दिसते. अन्वर हुसेन यांची चित्रे वास्तववादी शैलीशी नाते सांगणारी पण निव्वळ वास्तववादी शैलीच्या पलीकडे जाणारी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →