अक्षयकुमार (जन्म नाव : राजीव हरीओम भाटिया) हा भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने जवळपास १४० हिंदी चित्रपट केलेले आहेत. अक्षय कुमार फिल्म निर्माता , टीव्ही कार्यक्रम सादरकर्ता आहे. अक्षयकुमार हा कराटेचा ब्लॅकबेल्ट आहे. त्यामुळेच चित्रपटांव्यतिरिक्त त्याचे दूरचित्रवाणीवर 'खतरों के खिलाडी' आणि 'अमुल मास्टर शेफ' सारखे कार्यक्रम आलेले आहेत.
अक्षयकुमार ह्याचे खरे नाव राजीव हरीओम भाटिया आहे आणि अक्षयच्या आईचे नाव अरुणा भाटिया आहे. बॉलीवूडमध्ये येण्याआधी अक्षय थायलंडला शिकायला गेला होता तिथे त्याने कूक म्हणून हॉटेलमध्ये काम सुद्धा केले.
अक्षयकुमार सध्या कॅनडाचा नागरिक आहे.
अक्षय कुमार
यामागील विज्ञान आणि इतिहास.