अंजली अरुण सोमण (५ नोव्हेंबर, १९४७:निफाड, महाराष्ट्र) या मराठी लेखिका आहेत. त्यांनी कादंबरी, भाषविज्ञान व भाषांतरमीमांसा आणि वाङ्ममयीन पत्रव्यवहार याविषयांवर पुस्तके संपादित केली आहेत. त्यांनी लिहिलेल्या १९९५ साली “मराठी कथेची स्थितिगती” या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचे पारितोषिक मिळाले. “तिमिरभेद” (१९८९), आणि “बंदिश” (१९९४) या पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, या संस्थेकडून पारितोषिके मिळाली. “देहाचिये गुंती” (२०१७) या कादंबरीसाठी त्यांना २०२० साली मालतीबाई दांडेकर पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अंजली सोमण
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.