डाॅ. कल्याण वासुदेव काळे (१६ डिसेंबर, १९३७; - १७ जानेवारी, २०२१))
हे एक मराठी लेखक आणि मराठी भाषा, साहित्य ह्या विषयाचे अभ्यासक होते. आधुनिक भाषाविज्ञानाचे तज्ज्ञ आणि प्राचीन मराठी साहित्याचे अभ्यासक म्हणून ते परिचित आहेत.
काळे हे एम.ए. (संस्कृत), एम.ए. (मराठी) असून त्यांनी १९७८ साली, 'परांड्याचे हंसराज स्वामी: चरित्र, वाङ्मय आणि तत्त्वज्ञान' या विषयावर प्रबंध लिहून पीएच.डी. (मराठी) मिळवली. त्यांच्या या प्रबंधाला पुणे विद्यापीठाची डॉ. य.वि. परांजपे आणि कै. न.चिं. केळकर ही दोन पारितोषिके मिळाली होती.
काळे हे पुणे विद्यापीठातल्या मराठी विभागात अधिव्याख्याता होते. त्यांना महाविद्यालयीन व विद्यापीठीय अध्यापनाचा ३१ वर्षांचा अनुभव होता. १९६६ पासून य्यांनी नंदुरबार महाविद्यालय, पश्चिम विभागीय भाषा केंद्र (डेक्कन कॉलेज), पुणे विद्यापीठ या संस्थांत, मराठी साहित्य, संस्कृत, मराठी भाषा आणि भाषाविज्ञान या विषयांचे अध्यापन केले आहे. पीएच.डीचे ते संशोधक मार्गदर्शक होते.त्यांनी १६ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. त्यांनी अनेक ग्रंथांत व विविध वाङ्मयीन नियतकालिकांत लेखन केले आहे.
यशदा, पुणे या संस्थेत काळे आय.ए.एस.च्या विद्यार्थ्यांना अनेक वर्षे मराठी शिकवत असत.
ते अमराठी विद्यार्थ्यांना मराठी शिकवत असत.
शैलीविज्ञान हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. मराठीतील अनेक अभिजात साहित्यकृतींचे सौदर्य त्यांनी शैलीविज्ञानाच्या आधारे उलगडून दाखविले होते.
कल्याण वासुदेव काळे
थोडक्यात पण महत्त्वाचे.