अंजली पाटील ( २६ सप्टेंबर १९८७) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री असून तिने मराठी, हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड, सिंहली आणि इंग्रजी चित्रपटात देखील काम केले आहे. तिने २०११ मध्ये दिल्ली इन ए डे हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीस सुरुवात केली, ज्यात तिने रोहिणी नावाच्या मुलीची भूमिका साकारली. दिल्ली इन ए डे, चक्रव्यूह, न्यूटन तसेच सिंहली भाषेतील विथ यु विदाऊट यु या चित्रपटातील तिच्या भूमिका प्रसंशनिय ठरल्या. तर तेलुगू चित्रपट ना बंगारु तल्ली साठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दक्षिणेतील उत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा नंदिनी पुरस्कार देखील मिळाला.
अंजली पाटील यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला. तिचे बालपण आणि शिक्षण महाराष्ट्रातील नाशिक येथे झाले. तिने आपल्या वयाच्या चौदाव्या वर्षी चित्रपटात अभिनय करण्याचा निर्णय घेतला आणि तसे आपल्या पालकांना सांगितले. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभिनयाच्या शिक्षणासाठी पाठवले.
अंजली पाटील
या विषयावर तज्ञ बना.