स्मिता पाटील (जन्म : पुणे, ऑक्टोबर १७, इ.स. १९५५; मुंबई डिसेंबर १३, इ.स. १९८६. चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणारी अभिनेत्री होती. सर्वकालीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाणाऱ्या स्मिताने तिच्या जेमतेम एक दशकभराच्या कारकिर्दीत ८० हून अधिक हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते.
स्मिता पाटीलचा विवाह अभिनेता राज बब्बरशी झाला होता. १३ डिसेंबर १९८६ रोजी वयाच्या ३१ व्या वर्षी बाळंतपणाच्या गुंतागुंतीमुळे तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिचे दहाहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले. तिचा मुलगा प्रतीक बब्बर हा चित्रपट अभिनेता आहे ज्याने २००८ मध्ये पदार्पण केले.
स्मिताने श्याम बेनेगल यांच्या श्याम बेनेगल यांच्याचरणदास चोर (१९७५) चित्रपटातून पदार्पण केले होते. स्मिता ही त्यावेळी भारतीय सिनेमातील नवीन प्रवाहाची चळवळ असलेल्या समांतर सिनेमाची एक आघाडीची अभिनेत्री बनली होती. तरीही तिच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये देखील दिसली.
तिच्या अभिनयाची बऱ्याच वेळा प्रशंसा झाली आणि तिच्या सर्वात उल्लेखनीय भूमिकांमध्ये मंथन (१९७७), भूमिका (१९७७), जैत रे जैत (१९७८), गमन (१९७८), आक्रोश (१९८०), चक्र (१९८१), नमक हलाल (१९८२), बाजार (१९८२), उंबरठा (१९८२), शक्ती (१९८२), अर्थ (१९८२), अर्ध सत्य (१९८३), मंडी (१९८३), आज की आवाज (१९८४), चिदंबरम (१९८५), मिर्च मसाला (१९८५), अमृत (१९८६), डान्स डान्स (१९८७) आणि वारिस (१९८८) या चित्रपटांचा समावेश होतो.
अभिनयाव्यतिरिक्त स्मिता ही सक्रिय स्त्रीवादी आणि मुंबईतील महिला केंद्राची सदस्या होती. महिलांच्या समस्यांच्या प्रगतीसाठी ती मनापासून वचनबद्ध होती आणि पारंपारिक भारतीय समाजातील महिलांची भूमिका, त्यांची लैंगिकता आणि शहरी वातावरणात मध्यमवर्गीय महिलांना तोंड देत असलेल्या बदलांचा शोध घेणाऱ्या चित्रपटांमधून तिने काम केले.
तिच्या कारकिर्दीत तिला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि एक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९८५ मध्ये स्मिता अवघ्या वयाच्या तिसाव्या वर्षी पद्मश्री या भारताच्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाची प्राप्तकर्ती होती. स्मिताच्या स्मरणार्थ धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे अजूनही "स्मिता पाटील पब्लिक स्कूल" ही शाळा चालवली जाते.
स्मिता पाटील
या विषयातील रहस्ये उलगडा.