७, लोक कल्याण मार्ग (पूर्वीचे नाव ७, रेसकोर्स रोड) हे भारतीय पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आणि मुख्य कार्यस्थळ आहे. लोक कल्याण मार्गावर, नवी दिल्ली येथे स्थित, पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे अधिकृत नाव "पंचवटी" आहे. हे १९८० च्या दशकात बांधले गेले. हे लुटियन्स दिल्लीतील पाच बंगल्यांचा समावेश असलेल्या १२ एकर जागेवर पसरलेले आहे. यात पंतप्रधानांचे कार्यालय, निवास क्षेत्र, विशेष संरक्षण गटासाठी सुरक्षा भवन आणि अतिथीगृह आहेत. या सर्वांना एकत्रितपणे ७, लोक कल्याण मार्ग म्हणले जाते. यात पंतप्रधानांचे मुख्य कार्यालय नाही परंतु त्यामध्ये अनौपचारिक भेटीसाठी विचारविनिमय कक्ष आहे. संपूर्ण लोक कल्याण मार्ग हा जनतेसाठी बंद आहे. १९८४ मध्ये येथे राहणारे राजीव गांधी पहिले पंतप्रधान होते.
यात पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) नाही, जे सचिवालय इमारतीच्या दक्षिण ब्लॉकमध्ये, नवी दिल्ली जवळील रायसीना हिल वर आहे, जेथे कॅबिनेट सचिवालय कार्यरत आहे. सर्वात जवळचे दिल्ली मेट्रो स्टेशन लोक कल्याण मार्ग मेट्रो स्टेशन आहे. जेव्हा नवीन पंतप्रधान नेमले जातात तेव्हा त्यांच्या मूळ घराला सुरक्षा दिली जाते आणि नवीन घरात लवकरात लवकर जाण्याचा सल्ला दिला जातो. सप्टेंबर २०१६ मध्ये "रेसकोर्स रोड"चे नाव बदलून "लोक कल्याण मार्ग" अस्तित्वात आला.
७, लोक कल्याण मार्ग
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.