२०२५ महिला बेल्ट आणि रोड चषक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

२०२५ महिला बेल्ट आणि रोड चषक ही २० ते २५ सप्टेंबर २०२५ दरम्यान चीनमधील हांगचौ येथील झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड येथे खेळवण्यात आलेली महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती. स्पर्धेत चीन, हाँग काँग, म्यानमार आणि मंगोलिया या चार महिला संघांनी भाग घेतला. प्रत्येक संघाने साखळी फेरीत इतर प्रत्येक संघाविरुद्ध एक सामना खेळला आणि त्यानंतर तिसऱ्या स्थानासाठी सामना व अंतिम सामना खेळवण्यात आला.

साखळी फेरीनंतर हाँग काँग आणि म्यानमार यांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला. २५ सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात हाँग काँगने म्यानमारचा २६ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →