२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अंतिम सामना २९ जून २०२४ रोजी ब्रिजटाउन, बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल येथे २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा विजेता निश्चित करण्यासाठी खेळवला गेलेलाआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट सामना होता. हा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान खेळला गेला. आशियाई संघ आणि आफ्रिकन संघ टी२० विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ होती.
अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकला. विराट कोहलीला ५९ चेंडूत ७६ धावा केल्याबद्दल सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले, तर संपूर्ण स्पर्धेत १५ गडी बाद करणाऱ्या जसप्रीत बुमराहला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. हा सामना विराट कोहली, भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.
२०२४ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना
यामागील विज्ञान आणि इतिहास.