२८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरात पार पडलेल्या २०२२ राष्ट्रकुल खेळ स्पर्धेत भारत सहभागी देश होता. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळासाठी भारताकडून १०६ पुरुष आणि १०४ महिला अश्या एकूण २१० सदस्य संघाची घोषणा करण्यात आली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या महिला क्रिकेट प्रकारासाठी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पाठवला.
हॉकी संघाचा सदस्य मनप्रीत सिंग आणि बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हे दोघे उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक होते.
स्क्वॅशपटू अनाहत सिंग वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी राष्ट्रकुल खेळांमध्ये भाग घेणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला. ४५ वर्षीय लॉन बॉल्स खेळाडू सुनील बहादूर हे दलातील सर्वात वयस्कर खेळाडू होते. भारताचे पहिले पदक संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकासह जिंकले.
साईखोम मीराबाई चानूने २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले.
शरत कमलने २०२२ च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये टेबल टेनिस खेळात देशासाठी चार (३ सुवर्ण आणि १ रौप्य) पदके जिंकली. बहु-राष्ट्रीय बहु-विषय क्रीडा स्पर्धेत ४ किंवा अधिक पदके (३ सुवर्ण आणि १ रौप्य) जिंकणारा शरत कमल हा केवळ दुसरा आणि पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे. १९८६ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत पी.टी. उषाने ५ पदके (४ सुवर्ण आणि १ रौप्य) जिंकली. शरथने २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत ही कामगिरी केली.
महिला चौकडी संघाने जिकंलेले सुवर्णपदक हे भारताने लॉन बॉल्समध्ये जिकंलेले पहिलेच पदक होते आणि त्यानंतर पुरुषांच्या चौकडीनेसुद्धा रौप्य पदक जिंकले.
बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती आणि वेटलिफ्टिंग ह्या ४ खेळांमध्ये भारत सर्वोत्कृष्ट ठरला आणि बॉक्सिंगमध्ये भारताला दुसरे स्थान मिळाले.
२०२२ राष्ट्रकुल खेळात भारत
यामागील विज्ञान आणि इतिहास.