भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

हा लेख महिला संघाबद्दल आहे. पुरुष संघासाठी, भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ पहा.

भारताचा महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, ज्याला विमेन इन ब्लू म्हणूनही ओळखले जाते, हा महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतो. हा संघ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) द्वारे शासित आहे, आणि महिला कसोटी, महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (WODI) आणि महिला आंतरराष्ट्रीय टी२० (WT20I) दर्जा असलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) पूर्ण सदस्य आहे.

संघाने आजवर ४१ कसोटी सामने खेळले आहेत त्यातील ८ जिंकले आहेत तर ६ गमावले आहेत. उर्वरित २७ सामने अनिर्णित राहिले. संघाचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा ३१ ऑक्टोबर १९७६ रोजी बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी सामना होता.

संघाने आजवर खेळलेल्या ३४२ एकदिवसीय सामन्यांपैकी, १८८ सामन्यांमध्ये विजय मिळविला तर १४७ गमावले आहेत, २ सामने बरोबरीत सुटले आणि ५ सामने अनिर्णित राहिले. नोव्हेंबर २०२५ पर्यंत, भारत १२६ रेटिंग गुणांसह आयसीसी महिला एकदिवसीय संघ क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने २०२५ मध्ये एकदा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून ९८ धावांनी आणि २०१७ मध्ये इंग्लंडकडून ९ धावांनी पराभूत झालेल्या भारताने दोन वेळा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यांनी २००४, २००५-०६, २००६, २००८ मध्ये ४ वेळा एकदिवसीय आशिया चषक जिंकला आहे.

संघाने २०४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत, १११ जिंकले आहेत, ८६ गमावले आहेत, १ सामना बरोबरीत सुटला आणि ६ अनिर्णित राहिले. नोव्हेंबर २०२५ पर्यंत, भारत २६३ रेटिंग गुणांसह आयसीसी महिला टी२० संघ क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाकडून ८५ धावांनी पराभूत होणारा भारत एकदाच टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यांनी २०१२, २०१६, २०२२ मध्ये ३ वेळा टी२० आशिया चषक जिंकला आहे. याशिवाय, त्यांनी २०२२ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे आणि २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळविले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →