२०२२ महिला ट्वेंटी२० आशिया चषक

या विषयावर तज्ञ बना.

२०२२ महिला टी२० आशिया चषक ही महिला आशिया चषक स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. जी १ ते १६ ऑक्टोबर २०२२ दरम्यान सिलहट, बांगलादेश येथे पार पडली. ही स्पर्धा बांगलादेश, भारत, मलेशिया, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड आणि संयुक्त अरब अमिराती या संघादरम्यान खेळविली गेली. २० सप्टेंबर २०२२ रोजी आशियाई क्रिकेट परिषदेने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. बांगलादेश गतविजेता होता, २०१८ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा तीन गडी राखून पराभव करून त्यांनी प्रथमच विजेतेपद पटकावले होते. ही स्पर्धा सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवली गेली. सात संघ साखळी टप्प्यात खेळले, तर अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले.

मलेशियामध्ये जून २०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या २०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून युएई आणि मलेशिया स्पर्धेसाठी पात्र ठरले.

अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर ८ गडी राखून एकतर्फी विजय मिळवत सातव्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →