२०२२ आशिया चषक

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

२०२२ आशिया चषक (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव डीपी वर्ल्ड आशिया कप म्हणूनही ओळखला जातो) आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची १५ वी आवृत्ती होती, ज्याचे सामने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२२ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० (T20I) म्हणून खेळले गेले. सदर स्पर्धा मूलतः सप्टेंबर २०२० मध्ये होणार होती, कोविड-१९ साथीच्या आजारामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय जुलै २०२० मध्ये घेण्यात आला. त्यावेळी स्पर्धा २०२१ मध्ये श्रीलंकेत आयोजित करण्याचे ठरले, परंतु त्यानंतर ती पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. २०२२ च्या आवृत्तीचे यजमानपद राखून ठेवल्यानंतर पाकिस्तानने या स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते. तथापि, ऑक्टोबर २०२१ मध्ये, आशियाई क्रिकेट परिषद ने घोषणा केली की २०२२ मध्ये श्रीलंका स्पर्धेचे आयोजन करेल, पाकिस्तान २०२३ आवृत्तीचे आयोजन करेल.

२१ जुलै २०२२ रोजी, श्रीलंका क्रिकेट ने आशियाई क्रिकेट परिषद ला कळवले की ते देशातील आर्थिक आणि राजकीय संकटामुळे स्पर्धेचे आयोजन करण्याच्या स्थितीत नसतील. २७ जुलै २०२२ रोजी, आशियाई क्रिकेट परिषद ने पुष्टी केली की ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळली जाईल, श्रीलंका क्रिकेट स्पर्धेचे यजमान म्हणून काम करेल. स्पर्धेचे सामने २ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर करण्यात आले.

गतविजेता भारत ह्या आवृत्तीच्या सुपर फोर टप्प्यामधून स्पर्धेबाहेर पडला. अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव करून, त्यांचे आशिया चषक स्पर्धेतील सहावे आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० प्रकारातील पहिले विजेतेपद मिळविले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →