२०२१ महिला ट्वेंटी२० विश्वचषक अमेरिका पात्रता ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १८-२५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान मेक्सिकोमध्ये आयोजित केली गेली होती. २०२३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २०२३ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक या स्पर्धेच्या पात्रतेचा एक भाग सदर स्पर्धा होती. आयसीसीच्या अमेरिका भागासाठी सदर स्पर्धा खेळविण्यात आली. एकूण चार देशांनी यात भाग घेतला. आर्जेन्टिना आणि ब्राझिल ह्या दोन देशांनी २०१२ नंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेमध्ये भाग घेतला.
प्रत्येक संघाने प्रतिस्पर्धी संघाशी दोन सामने खेळले. ५ विजयांसह गुणतालिकेत अव्वल राहत अमेरिका संघ २०२२ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतेसाठी पात्र ठरला.
२०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.