२०२१ नामिबिया तिरंगी मालिका ही २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेची आठवी फेरी नामिबियामध्ये २६ नोव्हेंबर - ६ डिसेंबर २०२१ दरम्यान आयोजित केली होती. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता निश्चित ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आली. यजमान नामिबियासह संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. ओमानमध्ये झालेल्या चौथ्या फेरीमधील दोन न खेळलेले गेलेले सामने या फेरीमध्ये खेळवले गेले. सदर दोन सामने ओमानचे सुल्तान यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आले होते. स्पर्धेपूर्वी नियमित कर्णधार गेरहार्ड इरास्मुस दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याजागी नामिबियाच्या कर्णधारपदी जेजे स्मिटची नियुक्ती करण्यात आली. सर्व सामने हे विन्डहोक मधील वॉन्डरर्स क्रिकेट मैदान येथे झाले.
नामिबिया आणि ओमान या दोन्ही संघांनी एक-एक सामने जिंकले. परंतु २७ नोव्हेंबर रोजी कोरोनाव्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे उर्वरीत सहा सामने पुढे ढकलण्यात आले. पुढे ढकलण्यात आलेल्या ओमान आणि संयुक्त अरब अमिराती या दोन संघांमधील तीन सामने फेब्रुवारी २०२२ मध्ये द्विपक्षीय मालिका आयोजित करून खेळवले गेले.
२०२१ नामिबिया तिरंगी मालिका
यामागील विज्ञान आणि इतिहास.