२०२२ स्कॉटलंड तिरंगी मालिका (चौदावी फेरी)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

२०२२ स्कॉटलंड तिरंगी मालिका ही स्कॉटलंडमध्ये १० ते १७ जुलै २०२२ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान स्कॉटलंडसह नामिबिया आणि नेपाळ या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आलेली ही चौदावी फेरी होती.

मूलत: ही फेरी जून २०२० मध्ये होणार होती. परंतु कोव्हिड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर जून २०२१ मध्ये या फेरीचे सामने स्पेनला हलविण्यात आले परंतु पुन्हा एकदा मालिका पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी सामने जुलै २०२२ मध्ये होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →