२०२१ ओमान तिरंगी मालिका (सातवी फेरी)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

२०२१ ओमान तिरंगी मालिका (सातवी फेरी) ही ओमानमध्ये २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२१ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान ओमानसह पापुआ न्यू गिनी आणि स्कॉटलंड या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आली.

सदर स्पर्धेची ही सातवी फेरी नियोजनाप्रमाणे मे २०२१ मध्ये खेळवली जाणार होती, परंतु जगात कोरोनाव्हायरस या रोगाचा फैलाव झाल्यामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी स्पर्धा सप्टेंबर मध्ये होईल असे जाहीर झाले. पुढच्या आठवड्यात लगेचच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी स्पर्धेचे वेळापत्रक जारी केले. स्पर्धेसाठी सराव करण्यासाठी पापुआ न्यू गिनीने अमेरिका आणि नेपाळविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) द्विपक्षीय मालिका खेळल्या. तेही सामने मस्कतमध्येच पार पडले.

स्कॉटलंडने पहिले तीन सामने जिंकले, ओमाने दोन सामने जिंकले आणि एक सामना पावसामुळे रद्द करावा लागला. पापुआ न्यू गिनीच्या पराभवांची मालिका याही आवृत्तीत सुरू राहिली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →