२०२०च्या अमेरिकेतील निवडणुका

या विषयातील रहस्ये उलगडा.

२०२०च्या अमेरिकेतील निवडणुका

२०२० च्या अमेरिकेतील निवडणुका ३ नोव्हेंबर, इ.स. २०२० रोजी लढल्या गेल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्झच्या सगळ्या ४३५ बैठका, सेनेटमधील १०० पैकी ३५ बैठका आणि १३ गव्हर्नरपदांसाठी या निवडणुका घेण्यात आल्या. यांच्याबरोबर अनेक राज्य विधानसभा तसेच स्थानिक राज्यसंस्थांच्या निवडणुका या दिवशी झाल्या. या निवडणुकांत ज्यो बायडेन यांनी डॉनल्ड ट्रम्प यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपद मिळवले. डेमोक्रॅटिक पक्षाने अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या सभागृहातील बहुमत कायम राखले तर सेनेटमध्ये ४८-४८ (अधिक २ अपक्ष) असे सदस्य निवडले गेल्याने समसमान विभागणी झाली. ज्यो बायडेन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे असल्याने त्यांच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या सेनेटच्या अध्यक्ष झाल्या व त्याद्वारे डेमोक्रॅटिक पक्षाने सेनेटमध्ये आपले वर्चस्व राखले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →