२०२० अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

२०२० अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक

२०२० अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक ही अमेरिकेचा ४६वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक होती. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडणारी ही ५९वी चतुर्वार्षिक निवडणूक मंगळवार, नोव्हेंबर ३, इ.स. २०२० रोजी घेण्यात आली.

या निवडणूकांत कोणत्याही पक्षास उमेदवार उभे करण्यास मुभा असली तरी मुख्यत्वे लढत डेमॉक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांत होते. डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्यो बायडेन यांनी डॉनल्ड ट्रम्प यांचा २९०-२१७ असा इलेक्टोरल मताधिक्याने पराभव केला. बायडेन यांना सुमारे ७ कोटी ८० लाख तर ट्रम्प यांना सुमारे ७ कोटी २६ लाख मते मिळाली.

अनेक राज्यांतील सुरुवातीच्या मतमोजणीनंतर बायडेन यांना मताधिक्य मिळत असलेले दिसूनही ट्रम्प यांनी हा निकाल मंजूर करण्यास नकार दिला. काही राज्यांमध्ये पुनर्मोजणी झाल्यावर बायडेन जिंकल्याचे निश्चित झाले. इलेक्टोरल कॉलेजमध्ये १४ डिसेंबर, २०२० रोजी मतदान होउन या निकालांवर शिक्कामोर्तब होईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →