टिम केन

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

टिम केन

टिमोथी मायकल केन (इंग्लिश: Timothy Michael "Tim" Kaine, जन्म: २२ जून १९४९) हा एक अमेरिकन वकील, राजकारणी व विद्यमान सेनेटर आहे. २००६ ते २०१० दरम्यान व्हर्जिनिया राज्याच्या राज्यपालपदावर असलेला केन २०१२ साली अमेरिकन सेनेटवर निवडून आला. नोव्हेंबर २०१६ मधील अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवार हिलरी क्लिंटनने उपाध्यक्षपदासाठी केनची निवड केली आहे. क्लिंटन-केन जोडगोळीचा सामना प्रामुख्याने रिपब्लिकन पक्षाच्या डॉनल्ड ट्रम्प-माइक पेन्स ह्या जोडीसोबत झाला. या निवडणुकीत क्लिंटन-केनला मताधिक्य मिळाले परंतु इलेक्टोरल कॉलेजमधील मतविभागणीत पराभव झाल्याने ट्रम्प-पेन्स हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष झाले.

मिनेसोटाच्या सेंट पॉल शहरात जन्मलेला व कॅन्सस सिटी महानगरात वाढलेला केन पेशाने वकील असून त्याने हार्वर्ड विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले. डेमोक्रॅटिक पक्षात केन मवाळ विचारांचा मानला जातो व त्याच्या राजकीय धोरणांची तुलना विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन ह्याच्यासोबत केली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →