२००९ लोकसभा निवडणुका

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

२००९ लोकसभा निवडणुका

भारताच्या १५ व्या लोकसभेसाठीच्या निवडणुका एप्रिल १६, एप्रिल २२, एप्रिल २३, एप्रिल ३०, मे ७ आणि मे १३ अशा ५ टप्प्यात होणार आहेत. मतमोजणी मे १६ इ.स. २००९ रोजी करण्यात येणार आहे. या निवडणुकांत अंदाजे ७१ कोटी ४ लाख मतदार आपला कौल देतील. मागील निवडणुकांपेक्षा ही संख्या ४ कोटी ३० लाखांनी जास्त आहे. या निवडणुकीसाठी २००९ च्या अंदाजपत्रकात ११ अब्ज २० कोटी रुपयांची (१ कोटी ८० लाख युरो) तरतूद करण्यात आलेली आहे. या निवडणुकी बरोबर आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीममध्ये त्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकाही घेण्यात येतील.

भारतीय संविधानानुसार पाचवर्षात एकदा लोकसभा निवडणुका घेणे आवश्यक आहे. १४व्या लोकसभेची मुदत जून १, २००९ रोजी संपेल. १५वी लोकसभा त्याआधी अस्तित्वात येईल. या निवडणुका भारतीय निवडणुक आयोग घेते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →