२००९मधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर १३, इ.स. २००९ रोजी एकाच फेरीत घेण्यात आल्या. त्यांच्यासाठीची अधिसूचना भारतीय निवडणूक आयोगाने ऑगस्ट ३१ रोजी काढली होती. महाराष्ट्राबरोबरच अरुणाचल प्रदेश आणि हरियाणा या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकासुद्धा घेण्यात आल्या. मतमोजणी ऑक्टोबर २२, इ.स. २००९ रोजी करण्यात आली. यांपैकी महाराष्ट्रातील निवडणुकांत, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने बहुमत मिळवले व सत्ता काबीज केली, तर शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीने मुख्य विरोधी पक्षाचे स्थान मिळवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.