२०१७ गुजरात विधानसभा निवडणूक ही भारताच्या गुजरात राज्यामधील विधानसभा निवडणूक होती. ह्या निवडणुकीत गुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागांसाठी नवीन आमदार निवडले गेले. गेले २२ वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला काँग्रेस पक्षाने मोठे आव्हान दिले होते. पक्षाध्यक्ष राहुल गांधी तसेच पंततप्रधान मोदी ह्यांनी गुजरातमध्ये कसून प्रचार केला होता.
१८ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालांत भारतीय जनता पक्षाने ९९ जागा जिंकून बहुमत मिळविले. या पक्षाच्या नेत्याला गुजरातचे राज्यपाल पुढील सरकार रचण्याचे आमंत्रण देतील.
गुजरात विधानसभा निवडणूक, २०१७
या विषयातील रहस्ये उलगडा.