१९८८ महिला क्रिकेट विश्वचषक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

१९८८ महिला क्रिकेट विश्वचषक (प्रायोजक नावानुसार १९८८ शेल द्विशतसांवत्सरिक महिला क्रिकेट विश्वचषक) ही एक क्रिकेट स्पर्धा २९ नोव्हेंबर - १८ डिसेंबर १९८८ दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये झाली. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटनेद्वारे आयोजित गेली होती. महिला विश्वचषकातली ही चौथी विश्वचषक स्पर्धा होती. या आधीची स्पर्धा सहा वर्षांपूर्वी १९८२ साली न्यू झीलंडमध्ये झाली होती. माजी विजेते ऑस्ट्रेलिया होते. सर्व सामने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने या प्रकारामध्ये खेळवले गेले. ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळेस स्पर्धा दुहेरी साखळी पद्धतीने खेळविली गेली. यजमान ऑस्ट्रेलियासह इंग्लंड, न्यू झीलंड, आयर्लंड आणि नेदरलँड्स या पाच देशांनी भाग घेतला. आयर्लंड आणि नेदरलँड्सने विश्वचषक पदार्पण केले. तर वेळेवर भांडवल गोळा होऊ न शकल्याने भारत आणि वेस्ट इंडीजला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ८ गडी राखून पराभव केला आणि सलग तिसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. तर ३ऱ्या स्थानाकरता झालेल्या सामन्यात न्यू झीलंडने आयर्लंडवर ७० धावांनी विजय नोंदवत तिसरे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाच्या लिंडसे रीलर हिने सर्वाधिक (४४८) धावा केल्या तर लीन फुल्स्टन हिने सर्वाधिक १६ बळी घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →