१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक

या विषयातील रहस्ये उलगडा.

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक (प्रायोजक नावानुसार १९८२ हॅनशेल विटा फ्रेश विश्वचषक) ही एक क्रिकेट स्पर्धा इसवी सन १९८२ मध्ये न्यू झीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटनेद्वारे आयोजित गेली होती. महिला विश्वचषकातली ही तिसरी विश्वचषक स्पर्धा होती. या आधीची स्पर्धा पाच वर्षांपूर्वी १९७८ मध्ये भारतात झाली होती. माजी विजेते ऑस्ट्रेलिया होते. सर्व सामने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने या प्रकारामध्ये खेळवले गेले.

या वेळेस स्पर्धा तिहेरी साखळी पद्धतीने खेळविली गेली. यजमान न्यू झीलंडसह भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि आंतरराष्ट्रीय XI या पाच देशांनी भाग घेतला. आंतरराष्ट्रीय XI संघाने या आधी १९७३ च्या विश्वचषकात भाग घेतला होता. पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषकाचा निकाल हा अंतिम सामन्याद्वारे केला गेला.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →