१९८७-८८ शारजाह चषक ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २५ मार्च - १ एप्रिल १९८८ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते. शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत भारत, न्यू झीलंड आणि श्रीलंका या देशांनी भाग घेतला.
स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. चारही संघांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामने खेळले. भारताने दोन्ही सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला उर्वरीत दोन संघांमध्ये उपांत्य सामना खेळवला गेला. न्यू झीलंडने उपांत्य सामना जिंकला परंतु अंतिम सामन्यात भारताने न्यू झीलंडला ५२ धावांनी हरवत चषक जिंकला. विजेत्या भारतीय संघाला तीस हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले. भारताच्या नरेंद्र हिरवाणी याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
१९८७-८८ शारजा चषक
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.