१९८६-८७ शारजा चॅम्पियन्स चषक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

१९८६-८७ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २७ नोव्हेंबर - ५ डिसेंबर १९८६ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते व शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि श्रीलंका या देशांनी भाग घेतला.

स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. तिन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध एक एक सामने खेळले. वेस्ट इंडीजने तीनही सामने जिंकत चषक जिंकला. पाकिस्तान दुसरे स्थान पटकावत उपविजेते ठरले. भारताला एकच सामना जिंकला आला तर श्रीलंकेने तीनही सामने गमावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →