१९९०-९१ शारजा चषक

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

१९९०-९१ शारजाह चषक (किंवा प्रायोजक नावाने १९९०-९१ इन्स्टाफोन शारजाह चषक) ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २०-२१ डिसेंबर १९९० दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते. शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांनी भाग घेतला. योजनेनुसार भारत आणि वेस्ट इंडीजसुद्धा सदर स्पर्धेत भाग घेणार होते परंतु अमेरिका आणि इराक यांच्यामध्ये सुरू झालेल्या आखाती युद्धामुळे दोन्ही देशांनी स्पर्धेतून माघार घेतली.

स्पर्धा द्विपक्षीय मालिका पद्धतीने खेळवली गेली. दोन्ही संघांनी दोन सामने खेळले. पाकिस्तान आणि श्रीलंकेने एक-एक सामने जिंकले. परंतु दोन्ही सामन्यांमध्ये राखलेल्या उत्तम धावगतीच्या जोरावर पाकिस्तानला स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले. पाकिस्तानचा इजाझ अहमद आणि श्रीलंकेच्या रुमेश रत्नायकेला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →