१९८९-९० शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १३-२० ऑक्टोबर १९८९ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते व शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज या देशांनी भाग घेतला.
सदर स्पर्धा द्विगट फेरी पद्धतीने खेळवली गेली. प्रत्येक संघाने इतर संघाशी दोन वेळा सामने खेळले. पाकिस्तानने सर्व चार सामने जिंकत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतून मिळालेल्या उत्पन्नातून फझल महमूद, इक्बाल कासिम, कृष्णम्माचारी श्रीकांत, पॉली उम्रीगर आणि व्हिव्ह रिचर्ड्स या आजी-माजी खेळाडूंना प्रत्येकी ३५,००० अमेरिकन डॉलर इतक्या रकमेचे बक्षीस अथवा आर्थिक सहाय्याच्या रूपात दिली गेली.
१९८९-९० शारजा चॅम्पियन्स चषक
या विषयातील रहस्ये उलगडा.