१९३४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची दुसरी आवृत्ती इटली देशामध्ये २७ मे ते १० जून १९३४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ३२ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
यजमान इटलीने अंतिम फेरीच्या सामन्यात चेकोस्लोव्हाकियाला २-१ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले. १९३६ बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेप्रमाणे ही विश्वचषक स्पर्धादेखील राजकीय सामर्थ्य दाखवण्याकरिता वापरली गेली. इटलीचा तत्कालीन सर्वेसर्वा बेनितो मुसोलिनीने आपल्या फॅसिस्ट राजवटीचे मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन केले.
१९३४ फिफा विश्वचषक
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!