१९ वर्षांखालील आशिया चषक, २०१६ ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा श्रीलंकेमध्ये १५ ते २३ डिसेंबर २०१६ दरम्यान खेळवली गेली. सदर स्पर्धा ही १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१८ची पात्रता प्रक्रियेचा एक भाग होती. स्पर्धेमध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले, ज्यामध्ये १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६ स्पर्धेतील सहा संघ आणि २०१६ अशियाई विभाग दोन स्पर्धेतील मधील पहिले दोन संघ यांचा समावेश होता. अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा ३४ धावांनी पराभव करून स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९ वर्षांखालील आशिया चषक, २०१६
या विषयातील रहस्ये उलगडा.