ह.अ. भावे

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

ह.अ. भावे (जन्म - जानेवारी २१ इ.स. १९३३ मृत्यू - १८ जून, इ.स. २०१३)

ह.अ.भावे हे डोंबिवली येथे मार्च ३१ इ.स. १९९१ रोजी झालेल्या सातव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते. ते मराठी प्रकाशक परिषदेचे संस्थापक सदस्यही होते.

पुण्यातील वरदा प्रकाशन व सरिता प्रकाशन या दोन संस्थांतर्फे त्यांनी १९७३ साली प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली. विविध विषयांवरची हजारो पुस्तके प्रकाशित केली. त्यांनी जुन्या बाजारात विविध भाषांतील पुस्तकांचा शोध घेतला. त्यांचे प्रताधिकार विचारात घेऊन पुस्तकांचे स्वतः भाषांतर करून त्यांनी प्रचंड लिखाण केले. विक्रम आणि वेताळ, पंचतंत्र, विज्ञाननिष्ठा आणि संस्कृती, लोककथामाला, विचार नवनीत ही चाळीस पुस्तकांची मालिका इत्यादींच्या खपांचे विक्रम केले. वा.गो. आपटे संपादित 'शब्द रत्‍नाकर' हा मराठी शब्दकोश आणि 'महाराष्ट्र शब्दकोश' प्रकाशित करून त्यांनी कोशवाङ्मयामध्ये भर घातली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →