मुहम्मद होस्नी सय्यिद मुबारक (अरबी भाषा: محمد حسني سيد مبارك ; रोमन लिपी: Muhammad Hosni Sayyid Mubarak ;) (मे ४, इ.स. १९२८ - फेब्रुवारी २५, इ.स. २०२०) हे इ.स. १९८१ ते इ.स. २०११ या कालखंडात अधिकारारूढ असलेले इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होते.
होस्नी मुबारक यांना इ.स. १९७५ साली इजिप्ताचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून नेमले गेले. ऑक्टोबर १४, इ.स. १९८१ रोजी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अन्वर अल सादात याची हत्या झाल्यावर मुबारकने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. राजकारणात शिरण्यापूर्वी ते इजिप्ती वायुसेनेचे अधिकारी होते. इ.स. १९७२ ते इ.स. १९७५ या कालखंडात त्यांनी इजिप्ती वायुसेनेचा सेनापती म्हणून पदभार सांभाळला.
मुबारकने राष्ट्राध्यक्षपद सोडावे, अशी मागणी करणाऱ्या आंदोलकांनी २५ जानेवारी, इ.स. २०११ पासून देशभर निदर्शने आरंभली. जनतेने चालवलेल्या आंदोलनांच्या दबावापुढे झुकत होस्नी मुबारकाने फेब्रुवारी, इ.स. २०११ रोजी आपण इ.स. २०११ सालातील अध्यक्षपदाच्या निवडणुकांत भाग घेणार नसल्याची घोषणा केली. जनतेचे आंदोलन चालूच राहिल्याने अखेरीस उपराष्ट्राध्यक्ष ओमर सुलैमान याने ११ फेब्रुवारी, इ.स. २०११ रोजी मुबारकने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची घोषणा केली. १८ दिवसांच्या जनआंदोलनांमुळे होस्नी मुबारकाची ३० वर्षांची सत्ता संपुष्टात आली व सैन्याकडे सत्तेची सूत्रे तात्पुरती सोपवण्यात आली.
फेब्रुवारी २५, इ.स. २०२०मध्ये त्यांचे निधन झाले.
होस्नी मुबारक
थोडक्यात पण महत्त्वाचे.