इजिप्त (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: ˈiː.dʒɪpt; इजिप्शियन: केमेत (Kemet); कॉप्टिक: Ⲭⲏⲙⲓ (कीमि); अरबी/हिंदी: مصر (मिस्र); इजिप्शियन अरबी: Máṣr (मास्र); हिब्रू: מִצְרַיִם (मित्झ्रायिम); ग्रीक: Χημία (खेमिया)); अधिकृत नाव इजिप्तचे अरब गणराज्य हा उत्तर आफ्रिकेतील प्रजासत्ताक देश आहे. या देशाचा बहुतेक भाग आफ्रिकेमध्ये असून केवळ सिनाई द्वीपकल्प हा सुवेझ कालव्याच्या पूर्वेकडील भाग आशियामध्ये आहे. यामुळे इजिप्त हा देश मध्यपूर्वेशी संबंधित मानला जातो.
इजिप्तचे क्षेत्रफळ अंदाजे १०,२०,००० चौरस किलोमीटर आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने इजिप्त हा जगात पंधराव्या क्रमांकाचा देश आहे. इजिप्तच्या ७.७ कोटी लोकसंख्येपैकी (२००५चा अंदाज) बहुतेक लोक नाईल नदीच्या जवळ राहतात. या भागातच शेतीयोग्य जमीन आहे. इजिप्तचा इतर बराच प्रदेश हा सहारा वाळवंटाचा भाग आहे. या भागात फार कमी लोक राहतात. आजकालच्या इजिप्तमधील बहुसंख्य लोक शहरी असून ते अरब लोकसंख्याबहुल अश्या कैरो व अलेक्झांड्रिया, इजिप्त या शहरांजवळ राहतात.
इजिप्त हा देश त्याच्या प्राचीन संस्कृतीकरिता प्रसिद्ध आहे. गीझा येथील पिरॅमिड,स्फिक्स, कर्णाकचे मंदिर, राजांची दरी यासारखी जगातील प्रसिद्ध आश्चर्ये इजिप्तमध्ये आहेत. आजचा इजिप्त हा अरब व मध्यपूर्व भागाचे महत्त्वाचे राजकीय व सांस्कृतिक केंद्र समजला जातो.
इजिप्त
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!