प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य आफ्रिकेतील नाइल नदीच्या खोऱ्यात (आताच्या इजिप्त देशात) वसलेली संस्कृती होती. साधारणपणे इ.स.पू. ३१५० च्या सुमारास पहिल्या फॅरोने उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रीकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली असे मानले जाते. पुढील ३,००० वर्षे हीचा विकास होत गेला. या दरम्यान अनेक वंशाच्या राजांनी (फॅरो) सत्ता धारण केली. साधारण इ.स.च्या पहिल्या शतकात इजिप्तवर परकीय सत्तांचे शासन आले. इ.स.पू. ३१च्या सुमारास रोमन साम्राज्याने शेवटच्या फॅरोचा पराभव करून इजिप्तला आपला एक प्रांत करून घेतले. खोदकाम, बांधकाम, शेती यात प्रावीण्य मिळवलेली आणि स्थिर समाजरचना असलेली ही संस्कृती होती.
ओझायरिस या मृत्यूच्या देवते शिवाय जवळपास दोन हजार देवतांची पूजा प्राचीन इजिप्तमध्ये केली जात होती. देवाच्या सेवेसाठी पुरोहित नेमलेले होते. मृत्यूनंतर मनुष्य वेगळया लोकात जातो . तेथे त्याला नव्याने मिळणारे आयुष्य चिरंतन असते , असा प्राचीन इजिप्शियनांचा ठाम विश्वास होता. इजिप्शियनांच्या मते मृत्यू ही जीवनाची सुरुवात होती. त्यामुळे या संस्कृतीत मृतांबरोबरच त्यांची आठवण म्हणून कांही वैशिष्टपूर्ण दागिने मृतदेहाबरोबर पुरण्याची प्रथा येथे होती. इजिप्तमध्ये प्राचीन काळी हायरोग्लिफक्स ही चित्रलिपी वापरली जात असे. वनस्पतीपासून तयार केलेल्या ‘पपॅरस’ नावाच्या कागदावर लिखाण केलं जात असे.
प्राचीन इजिप्त संस्कृती
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.