तमिळ भाषा (तमिळ: தமிழ் மொழி , तमिळ मोळि) ही एक द्राविड भाषा असून ती तमिळ लोकांची मातृभाषा आहे. तमिळ दक्षिण आशियातील एक प्राचीन भाषा आहे. दक्षिण भारतातील "तमिळनाडु" (अर्थ : तमिळ राष्ट्र) तसेच पोंडेचेरी ह्या केंद्रशासित प्रदेशाची राजभाषा आहे (अर्थ: नवी चेरी) तसेच भारतातील ‘अभिजात भाषे’चा (Classical Language) पहिला मान तमिळ भाषेला देण्यात आला असून ६.५ कोटीहून अधिक लोक ही भाषा वापरतात. श्रीलंका (இலங்கை /इलङ्गै) आणि सिंगापूर (சிங்கப்பூர் /सिंगप्पूर्) देशात तमिळ भाषेस अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे तसेच ती न्यूनाधिक प्रमाणात मलेशिया आणि मॉरिशस येथेही दैनंदिन वापरात आढळून येते.
तमिळ भाषेला स्वतःची अशी विशिष्ट तमिळ लिपी आहे. ह्या भाषेतील साहित्य सुमावर्षाहून अधिक प्राचीन आहे. ख्रिस्तपूर्व पहिल्या आणि दुसऱ्या शतकातील लेख थायलंड आणि इजिप्त येथे सापडल
तमिळ साहित्याचा आरंभीचा काळ हा साधारणपणे तमिळ संगम काळातील साहित्यात पहावयास मिळतो, हा साधारणपणे इ.स.पूर्व ३०० वर्ष ते ३०० इ.स.ह्या दरम्यान होता. पुरातत्त्व खात्यास भारतातील प्राचीन शिलालेखांपैकी किंवा प्राचीन लेखांपैकी ५५ टक्क्यांहून अधिक लेख तमिळ भाषेत आढळून आले आहेत. १५७८ मध्ये, पोर्तुगीज ख्रिश्चन मिशनऱ्यांनी थंबीरन वनाक्कम नावाचे जुन्या तमिळ लिपीतील तमिळ प्रार्थना पुस्तक प्रकाशित केले, त्यामुळे तमिळ ही छापली आणि प्रकाशित होणारी पहिली भारतीय भाषा बनली.
२००१ च्या आकडेवारीनुसार तमिळ भाषेत १८६३ वृत्तपत्रे प्रकाशित होतात. त्यांपैकी ३५३ वृत्तपत्रे ही दैनिके आहेत.
तमिळ भाषा
या विषयावर तज्ञ बना.