होयसळेश्वर मंदिर, ज्याला फक्त हळेबीडु मंदिर असेही संबोधले जाते, हे शिवाला समर्पित १२व्या शतकातील हिंदू मंदिर आहे. हे हळेबीडु मधील सर्वात मोठे स्मारक आहे. हळेबीडु हे कर्नाटक राज्यातील एक शहर आणि होयसळ साम्राज्याची पूर्वीची राजधानी होते. हे मंदिर एका मोठ्या मानवनिर्मित तलावाच्या काठावर बांधले गेले आणि होयसळ साम्राज्याचा राजा विष्णुवर्धन यांनी प्रायोजित केले. त्याचे बांधकाम इ.स. ११२१ च्या आसपास सुरू झाले आणि इ.स. ११६० मध्ये पूर्ण झाले.
१४ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, उत्तर भारतातील दिल्ली सल्तनतच्या मुस्लिम सैन्याने हळेबीडुवर दोनदा आक्रमण केले आणि लुटले. ह्यात हे मंदिर आणि राजधानी उद्ध्वस्त झाली आणि दुर्लक्षित अवस्थेत पडली. हे हासन शहरापासून ३० किलोमीटर (१९ मैल) आणि बंगळुर पासून सुमारे २१० किलोमीटर (१३० मैल) वर आहे. हे भारतातील जागतिक वारसा स्थानांपैकी एक आहे.
होयसळेश्वर मंदिर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?