चेन्नकेशव मंदिर (बेलूर)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

चेन्नकेशव मंदिर (बेलूर)

चेन्नकेशव मंदिर, ज्याला केशव, केशव किंवा बेलूरचे विजयनारायण मंदिर असेही संबोधले जाते, हे भारतातील कर्नाटक राज्यातील हसन जिल्ह्यातील १२व्या शतकातील विष्णू देवाचे हिंदू मंदिर आहे. इ.स. १११७ मध्ये राजा विष्णुवर्धन यांनी बेलूर येथे यागाची नदीच्या काठावर, होयसळ साम्राज्याची राजधानी म्हणून हे मंदिर बांधले होते. मंदिर तीन पिढ्यांमध्ये बांधले गेले आणि पूर्ण होण्यासाठी १०३ वर्षे लागली. युद्धांदरम्यान त्याचे वारंवार नुकसान झाले आणि लुटले गेले, व त्यामुळे त्याची वारंवार पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली गेली. हसन शहरापासून हे ३५ किमी आणि बंगळुर पासून सुमारे २२० किमी वर हे आहे.

चेन्नकेशवचा अर्थ "सुंदर केसव" असा होतो. मध्ययुगीन हिंदू ग्रंथांमध्ये त्याचे आदरपूर्वक वर्णन केले गेले आहे आणि हे वैष्णव धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हे भारतातील जागतिक वारसा स्थानांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →