रामप्पा मंदिर ह्या मंदिराला काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर (Ramappa Temple) असेहा संबोधतात. हे मंदिर तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील व्यंकटापूर मंडळातील पालमपेट ह्या ठिकाणी हे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर मुलुगुपासून १५ किमी (९.३ मैल), वरंगलपासून ६६ किमी (४१ मैल), हैदराबादपासून २०९ किमी (१३० मैल) अंतरावर आहे. हे एक शिव मंदिर आहे. शिवाच्या रुद्रेश्वर अवताराची इथे पुजा केली जाते. महाशिवरात्री हा मुख्य उत्सव साजरा केला जातो. हे १३ व्या शतकातील काकतीय राजवटीत बनवलेले एक शिव मंदिर आहे. २०२१ मध्ये ह्या मंदिराचा जागतिक वारसा स्थळांच्या (युनेस्को जागतिक वारसा स्थळ- UNESCO World Heritage Site) यादीत समावेश करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामप्पा मंदिर
थोडक्यात पण महत्त्वाचे.