हैदराबाद

यामागील विज्ञान आणि इतिहास.

हैदराबाद

हैद्राबाद हे भारतातील तेलंगणा राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हैद्राबादची इ. स. २००१ सालची लोकसंख्या ७७ लाख ४० हजार ३३४ आहे मोत्यांचे शहर अशी या शहराची एकेकाळी ओळख होती. या शहराला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यकला वारसा असल्याने पर्यटनस्थळ म्हणून हे शहर नावारूपास आले आहे. हे शहर दख्खन पठारावरील उर्दू साहित्यिक शहर आहे. शहरात १९९० नंतर शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्मिती आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगधंद्यांची वाढ झाली दाक्षिणात्य भाषांतील चित्रपटनिर्मितीचे हैद्राबाद अग्रगण्य केंद्र आहे.

२०१५ सालापर्यंत हैद्राबाद अखंड आंध्र प्रदेश राज्याच्या राजधानीचे शहर होते. येथे चारमिनार हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.रामोजी फिल्म सिटी हे आकर्षण स्थळ आहे. तसेच शहरामध्ये बिरला मंदिर, गोलकोंडा किल्ला इत्यादी स्थळे प्रसिद्ध आहेत.

पाकिस्तानमध्येही सिंध प्रांतात एक हैद्राबादआहे. त्याच्याशी घोटाळा होऊ नये म्हणून तेलंगणातील हैदराबादला, हैदराबाद दख्खन म्हणायचा प्रघात आहे, तर पकिस्तानातील हैदाराबादला सिंध हैदराबाद.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →