निजामाबाद

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

निजामाबाद

निजामाबाद (Nizamabad) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या निजामाबाद जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. निजामाबाद शहर तेलंगणाच्या वायव्य भागात तेलंगणा-महाराष्ट्र सीमेजवळ वसले असून ते हैदराबादच्या १७५ किमी उत्तरेस तर नांदेडच्या ११० किमी आग्नेयेस स्थित आहे. २०११ साली निजामाबादची लोकसंख्या सुमारे ३.१ लाख होती. लोकसंख्येनुसार ते तेलंगणामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (हैदराबाद व वरंगल खालोखाल). २०१४ सालापूर्वी निजामाबाद जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता.

निजामाबादची स्थापना १९०५ साली निजामाने केली. आजच्या घडीला निजामाबाद उत्तर तेलंगणामधील एक प्रमुख शहर आहे. या जिल्ह्याचे नाव निजामाबाद (निजाम-ए-अबादी) हे हैदराबादच्या निजाम असफ जाही, सहावा याच्या नावावरून पडले, ज्याने १८ व्या शतकात दख्खनवर राज्य केले होते, मूळतः जिल्याला इंदूर असे म्हणतात, जे राजा इंद्रदत्त याच्या नावावरून प्रचलित होते ज्याने ५ व्या शतकात या प्रदेशावर राज्य केले. निजाम म्हणजे निजाम, हैदराबाद राज्याचा राज्यपाल (साम्राज्याचा) आणि आबाद म्हणजे 'चिरायु'.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →