हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ (अझरबैजानी: Heydər Əliyev adına beynəlxalq hava limanı) (आहसंवि: GYD, आप्रविको: UBBB) हा अझरबैजान देशामधील सर्वात मोठा व कॉकेशस भागातील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी बाकूच्या २० किमी ईशान्येस स्थित आहे. बिना आंतरराष्ट्रीय विमानतळाला २००४ साली अझरबैजानचा तिसरा राष्ट्राध्यक्ष हैदर अलियेव ह्याचे नाव देण्यात आले. अझरबैजानची राष्ट्रीय विमान कंपनी अझरबैजान एरलाइन्सचे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.