हे राम नथुराम हे शरद पोंक्षे यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले मराठी नाटक आहे. त्यातील नथुराम गोडसेची प्रमुख भूमिका त्यांनीच केली आहे. नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नाशिकमध्ये ५ ऑक्टोबर, २०१६ रोजी झाला. प्रमोद धुरत आणि शरद पोंक्षे यांच्या माउली भगवती प्रॉडक्शन आणि मोरया यांच्या सहयोगाने ह्या नाटकाची निर्मिती झाली आहे.
नथुराम गोडसे यांच्यावर नाटक सादर करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नव्हता. कारण यापूर्वी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या प्रदीप दळवी यांच्या नाटकाचे ८१८हून अधिक प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर झाले होते. त्यात देखील शरद पोंक्षे हे नथुराम या प्रमुख व्यक्तिरेखेत होते. तो प्रयोगही लक्षणीय होत असे; परंतु नव्याने आलेले हे ‘राम नथुराम’ नाटक शरद पोंक्षे यांनी लिहिलेले असून दिग्दर्शनसुद्धा त्यांचेच आहे. त्यामुळे या नाटकाचे कुतूहल होते. ते या दुहेरी भूमिकेत पूर्णतया यशस्वी झाले असे म्हणले जाते. या नव्याने आलेल्या नाटकात जसा काही नव्या घटनांचा उल्लेख दिसतो, तसा जुन्या घटना ज्या आधीच्या नाट्यप्रयोगात पाहिल्या त्याही दिसतात. त्यांना गोडसे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा आधार आहे.
हे राम नथुराम
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.